Saturday, December 17, 2011

कृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाने अमरावती जिल्हयात आणली समृध्दी

कृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातुन अमरावती जिल्हयातील चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला वि, जळका जगताप, पाथरगाव, टेंभुर्णी, आमदोरी, निमला, सालोरा, वाढोणा, उमरपुर थुगाव या 10 गावांमध्ये जुन 2011 पासुन अफार्म या संस्थे मार्फत प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली असुन उर्वरीत गावे कारला, सावंगा वि, नया सावंगा, मालखेड, लालखेड, दहिगाव, कळमगाव, सातेफळ पळसखेड या गावांचा प्रकल्पात समावेश झाला आहे.

कृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या 10 गावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत असतांना घरोघरी सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणाच्या अभ्यासाअंती असे आढळुन आले की या 10 गावांमधील दुग्ध उत्पादन खुपच कमी आहे या गावांच्या जवळच कारला या गावामध्ये निलय डेअरी नावाची दुध डेअरी आहे. तीची क्षमता 15000 ली. प्रती दिवस आहे. सध्या निलय डेअरी अमरावती, वर्धा जिल्हयातुन दुध खरेदी करतात परीणामी वाहतुक खर्च जास्त होत होता. या 10 गावांमध्येच दुध मिळाले तर दुग्ध उत्पादकांना जादा पैसे देणे शक्य आहे असे निलय डेअरी तर्फे आश्वासन देण्यात आल्या नंतर त्यांच्या सोबत कृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातुन भागीदारी करण्यात आली.

चांदुर रेल्वे क्लस्टर मध्ये दुग्ध उत्पादन कमी का आहे याचे आढळुन आलेले कारणे -
1) चाऱ्याचे उत्पादन अत्यल्प.
2) बँके मार्फत दुधाळ जनावरे खरेदी साठी कर्ज मिळण्यास येणारे अडथळे.
3) शेतकऱ्यांची कर्ज परतफेडीची मानसिकता.
4) पशुवैद्यकीय सेवा.
5) दुग्ध उत्पादकाला वेळेवर दुधाचे पैसे मिळणे.
6) विक्री व्यवस्थेत पारदर्शकता.

या सर्व अडचणींवर मात करून दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी सर्व सहभागी घटकांना सोबत घेउन कृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातुन पब्लीक प्रायव्हेट वित्तिय संस्था (PPFIP) हे मॉडेल विकसीत करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात संयुक्त दायीत्व गट (JLG), निलय दुध डेअरी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदुर रेल्वे असा त्रिपक्षीय करार करण्यात आला. या करारा अंतर्गत गाई खरेदी साठी 25% रक्कम JLG मधील सभासद भरणार तसेच निलय दुध डेअरी हि बँकेसाठी JLG ला जामीनदार राहणार. त्यामुळे बँक कर्ज देण्यास तयार झाली हे सर्व JLG सभासदांचे वैयत्कीक कर्ज प्रकरणे नाबार्ड कडे अनुदाणासाठी पाठविण्यात येणार आहेत. या मध्ये खुल्या प्रवर्गास 25% . जा. . . साठी 33% अनुदानाची तरतुद आहे.

दुग्ध व्यवसाया साठी कृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा अंतर्गत कृषी विभागाचा वैरण विकास कार्यक्रम हा या 10 गावांमध्ये राबविण्यात आलाकृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातुन चांदुर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी या गावातील 6 दुग्ध उत्पादकांचा महालक्ष्मी संयुक्त दायीत्व गट (JLG) स्थापन करण्यात आला या गटाचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदुर रेल्वे येथे खाते उघडण्यात आले संयुक्त दायीत्व गटाचे सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली त्रिपक्षीय करारावरती सही करण्यात आली. नंतर सर्व 6 सभासदांनी 50% जर्शी गाईंची चांदुर बाजार, रिध्देश्वर तसेच अंजनसींगी तालुका तिवसा येथे गाईंची पाहणी केली पहिल्या टप्प्यात 6 गाई खरेदी करण्यात आल्या. या 6 गाईंसाठी 180000 कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदुर रेल्वे कडुन उपलब्ध करून देण्यात आले. प्रती सभासद 2 गाई अश्या एकुण 12 गाईंचा हा प्रस्ताव आहे या साठी तीन लाख साठ हजार रू. (360000 रू) कर्जास सेंट्रल बँकेने मंजुरी दिली आहे. उर्वरीत 6 गाई 3 महिन्यानंतर देण्यात येणार आहे. तसेच 25% रक्कम म्हणजे 45000 रू. JLG सभासदांचे प्रत्येक 7500 रू. प्रमाणे जमा केले आहे. पुढच्या टप्प्यातील 6 गाई खरेदी करतांना JLG सभासद उर्वरीत 25% रक्कम त्यावेळी जमा करतील. या गाईंचा विमा हा चोला इंन्श्युरन्स सर्व्हीस यांचे कडुन उतरविण्यात आला आहे. या JLG साठी कर्ज उपलब्ध करून देतांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदुर रेल्वे चे व्यवस्थापक तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विभागीय व्यवस्थापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या साठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे सहकार्य लाभले. तसेच पशुसंवर्धन विभागा मार्फत चारा बियाणे वाटप करण्यात आले आहे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे साठी कृषी समृध्दी: समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा मार्फत मेळावे घेण्यात आले आहेत शासनाच्या विविध योजना या क्लस्टर मध्ये प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. तसेच पशुवैद्यकीय सेवा निलय डेअरी मार्फत देखील पुरविण्यात येणार आहेत. या साठी मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी जिल्हा प्रकल्प समन्वय समिती च्या सर्व सदस्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment